Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

आटपाडीत राजकीय पक्षाच्या महिलेचा विनयभंग, एकाला अटक

आटपाडीत राजकीय पक्षाच्या महिलेचा विनयभंग, एकाला अटक



आटपाडी : खरा पंचनामा 

एका राजकीय पक्षाच्या पदाधिकारी महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी आटपाडी पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. याबाबत पीडित महिलेने पत्रकार परिषदेत माहिती दिली.

रूपेशकुमार पाटील (वय ३७, रा. कौठूळी) असे संशयिताचे नाव आहे. या गंभीर प्रकरणाची माहिती पीडितेने पत्रकार बैठकीत दिली. तसेच आटपाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून संशयिताला अटक करण्यात आली आहे.

पीडित महिला आणि पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की पीडिता एका पक्षाची ‌पदाधिकारी म्हणून काम करते. त्यांची बदनामीचे कारस्थान केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. उत्तरप्रदेशातून अज्ञात व्यक्तींनी समाजमाध्यमावरून मेसेज पाठवले. सुरुवातीच्या मेसेजकडे पीडितेने दुर्लक्ष केले. नंतरही पुन्हा संवाद चालू केला. त्यावेळी त्याला खडसावले. राजकिय पार्श्वभूमी सांगीतल्यावर त्यानें  इन्स्टाग्रामवरून अज्ञाताने अश्लील बोलण्यासाठी नंबर मिळाल्याचे सांगितले. 

त्यानंतर आटपाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली. सायबर विभागाने केलेल्या तपासानंतर संशयित रूपेशकुमार पाटील याचे नाव निष्पन्न झाले. त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.