ठाकरे कुटुंबातील व्यक्ती तुरुंगात जाणार!
मुंबई : खरा पंचनामा
एकनाथ शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी ठाकरे गटाच्या पाच खासदारांवर कारवाई करण्यात येणार असल्याचं सांगितलं आहे. या पाचही खासदारांनी व्हीप पाळला नसल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचं राहुल शेवाळे यांनी सांगितलं आहे. त्यानंतर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी मोठा दावा केला आहे. शिरसाट यांनी थेट ठाकरे कुटुंबातील व्यक्तीच तुरुंगात जाणार असल्याचं मोठं विधान केलं आहे.
संजय शिरसाट माध्यमांशी संवाद साधत होते. कोव्हिड घोटाळ्यातील संशयित सुजीत पाटकर यांनी ईडीच्या विरोधात साक्ष दिली आहे. ईडीने जबरदस्तीने जबाब नोंदवून घेतला. मला धाक दाखवून माझा जबाब नोंदवून घेतल्याचं सुजीत पाटकर यांनी म्हटलं आहे.
त्याबाबत संजय शिरसाट यांना विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी मोठे बॉम्बच टाकले. तुम्हाला उगाच चौकशीसाठी बोलावलं का? उगाच कस्टडीत घेतलं का? मारून आरोप सिद्ध करता येत नाही. तुमच्याकडे कागदपत्र असेल गुन्ह्यात अडकला असेल तरच शिक्षा होते, असं संजय शिरसाट म्हणाले.
तुम्ही खून जरी केला असेल पण पुरावे नसतील तर कोर्ट सोडतं ना? पुरावा असेल तर तुम्हाला कुठेही माफी मिळत नाही. त्यामुळे याचिका दाखल करून होत नाही. त्यांना मदत करणारे जे कोणी असेल त्यांना सांगतो. आता वेळ तुमची येणार आहे. तुम्हाला तुरुंगात जावंच लागणार आहे, असा इशारा शिरसाट यांनी दिला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.