Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

चंदनशिवे खून प्रकरणात मुंबईतील पोलिस! बऱ्याच दिवसांपासून होता गैरहजर

चंदनशिवे खून प्रकरणात मुंबईतील पोलिस!
बऱ्याच दिवसांपासून होता गैरहजर



सांगली : खरा पंचनामा

सांगलीतील तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक सूरज चंदनशिवे याच्या खून प्रकरणात त्याच्याच गावातील दोघांना सांगोला पोलिसांनी अटक केली आहे. यातील एक संशयित मुंबई पोलिस दलात असल्याचे समजते. तो मुंबईत बऱ्याच दिवसांपासून गैरहजर असल्याचे सांगण्यात येत आहे.

सुनील मधुकर केदार असे त्याचे नाव आहे. त्याच्यात आणि मृत सूरज चंदनशिवे यांच्यात आर्थिक वाद असल्याचे सांगोला पोलिसांनी सांगितले आहे. पण त्यांच्यात नेमका कोणत्या व्यवहाराचा वाद होता हे सांगोला पोलिसांनी स्पष्ट केले नाही. पण चंदनशिवे पोलिस दलात आल्यापासून त्यांच्यात आर्थिक देवघेव होती, अशी चर्चा आहे.

तर चंदनशिवे याला दुसरा विवाह केल्याने सक्तीची सेवानिवृत्ती देण्यात आली होती. याचे आदेश कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी मार्चमध्ये दिले होते. त्यानंतर चंदनशिवे गावीच रहात होता.

दरम्यान चंदनशिवे याची दुसरी पत्नी पोलिस दलात कार्यरत होती. चंदनशिवे आणि संशयित केदार यांच्यात खरेच आर्थिक वाद होते का तसेच चंदनशिवे याची दुसऱ्या पत्नीचा केदार याच्याशी काही संबंध होता का याचा तपास पोलिस करत आहेत. सध्या तरी चंदनशिवे याच्या खुनातील संशयितांना पकडण्यात आले असले आणि प्राथमिक तपासात आर्थिक वाद असल्याचे समोर आले असले तरी पोलिस अधिक तपास करत आहेत. त्यातून धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.