मंत्रालयातील जाळीवर उड्या मारून आंदोलन!
मुंबई : खरा पंचनामा
मंत्रालयात आज अचानक मोठा गोंधळ उडताना बघायला मिळाला. मंत्रालयाच्या मुख्य इमारतीच्या आवारात पहिल्या माळ्यावर जाळी लावण्यात आली आहे. कुणीही उडी मारुन आत्महत्या करु नये, सुरक्षेच्या कारणास्त या जाळी बांधण्यात आली आहे.
याच जाळ्यांवर उडी मारुन काही नागरिकांनी आंदोलन केल्याची माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अशाप्रकारे आंदोलन करणारे आंदोलक हे अप्पर वर्धा धरणग्रस्त आहेत. आपल्या मागण्यांकडे सरकारकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत आंदोलकांनी आज थेट मंत्रालयात जाऊन आंदोलन केले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.