कलेक्शन फेम पुन्हा डॉक्टरांच्या रडारवर!
सेवानिवृत्त व्यक्तीने दिली म्हणे यादी
सांगली : खरा पंचनामा
डॉक्टरांनी सांगलीचा कार्यभार घेताच अनेक कलेक्शन फेम लोकांना दणका दिला होता. काही महिन्यांपूर्वी झालेल्या बदल्यांमध्येही त्यांनी वेचून असे लोक बाहेर काढले होते. आता पुन्हा एकदा जिल्ह्यातील कलेक्शन फेम त्यांच्या रडारवर आले आहेत. एका सेवानिवृत्त व्यक्तीने त्यांची यादी डॉक्टरांना दिल्याची चर्चा रंगली आहे.
सांगलीच काय संपूर्ण महाराष्ट्रात या खात्यात अनेक कलेक्शन फेम वर्षानुवर्षे तळ ठोकून आहेत. यांच्याच खात्यातील 'तो' विभाग मॅनेज केला की यांना रान मोकळेच. सर्व मॅनेज करणारा प्रभारी लोकांनाही हवा असतो. त्यामुळेच यापूर्वी या मॅनेजमेंटमध्ये तरबेज असलेल्याना डॉक्टरांनी चांगलाच धडा शिकवला होता.
आता पुन्हा या कलेक्शन फेम लोकांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
एका सेवानिवृत्त व्यक्तीने म्हणे डॉक्टरांची खास भेट घेत त्या लोकांची यादीच दिल्याची चर्चा या खात्यात सुरू आहे. त्यामुळे मागच्या कारवाईत वाचलेल्यांचे धाबे दणाणले आहेत.
दरम्यान मॅनेज करणाऱ्यास मी यापूर्वी कोणालाही मॅनेज करत नव्हतो, त्यामुळे जे कलेक्शन होईल ते मलाच दे कोणालाही मॅनेज करायची गरज नाही असे म्हणणारे काही प्रभारीपण डॉक्टरांच्या रडारवर आल्याची चर्चाही जोरात सुरू आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.