जयसिंगपूर येथील शिक्षण संस्थेचा अध्यक्ष, मुख्याध्यापक, शिपायाला लाच घेताना अटक!
शिक्षण क्षेत्रात खळबळ
कोल्हापूर : खरा पंचनामा
शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर येथील संजीवनी शिक्षण प्रसारक मंडळाचा अध्यक्ष, मुख्याध्यापक आणि शिपायाला ४५ हजार रूपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. बुधवारी दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. या घटनेमुळे कोल्हापूर जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
संस्थेचा अध्यक्ष अजित उद्धव सूयर्वंशी, मुख्याध्यापक महावीर आप्पासाहेब पाटील, शिपाई अनिल बाळासो टकले अशी अटक केलेल्यांची नावे आहे. संजीवनी शिक्षण संस्था संचलित आण्णासाहेब विभूते विद्या मंदीर ही प्राथमिक शाळा धरणगुती येथे आहे. या शाळेतील एका शिक्षिकेला संस्थेच्या इमारतीच्या भाड्यापोटी एप्रिल महिन्या पूणर् पगार ९५ हजार ५७७ रूपये इतक्या रकमेची लाच मागितली. शिवाय ती दोन हप्त्यात देण्यास सांगितले.
लाचेची रक्कम न दिल्यास वेतनवाढ रोखण्याची भीती घातली. त्यानंतर लाचेची रक्कम मुख्याध्यापक पाटील यांच्याकडे देण्यास सांगितले. तर मुख्याध्यापकाने ही रक्कम शिपाई टकले याच्याकडे देण्यास संबंधित शिक्षिकेला सांगितले होते. याबाबत तक्रारदार शिक्षिकेने कोल्हापूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. या विभागाने तक्रारीची पडताळणी केल्यानंतर तिघांनी लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर बुधवारी ४५ हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. याप्रकरणी तिघांवर जयसिंगपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.