विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांची सोमवारी सह्याद्री वाहिनीवर विशेष मुलाखत!
पुणे : खरा पंचनामा
दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील हॅलो सह्याद्री या कार्यक्रमात कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यानी विशेष मुलाखत प्रसारित करण्यात येणार आहे. पोलिस दलातील विविध विषयावर गौरी स्वकूळ यानी श्री. फुलारी यांची मुलाखत घेतली आहे.
सोमवार दि. ७ ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता या मुलाखतीचे प्रसारण करण्यात येणार आहे. तसेच त्याचे पुनः प्रसारण त्याच दिवशी रात्री अकरा वाजता तसेच दि. ८ ऑगस्ट रोजी मध्यरात्री दीड पहाटे साडेचार आणि सकाळी नऊ वाजता करण्यात येणार आहे. दूरदर्शन पुणे यांनी या मुलाखतीची निर्मिती केली असून विनायक मोरे निर्माते आहेत तर नारायण ढेबे यांनी निर्मिती सहाय्य केले आहे.
कोल्हापूर परिक्षेत्रातील पोलिस ठाण्यामध्ये राबवण्यात आलेले विविध उपक्रम, महिला, मुलींबाबतचे गुन्हे, गुन्हयाचे प्रमाण कमी करण्यासाठी राबवलेल्या उपाययोजना याबाबत या मुलाखतीमध्ये उहापोह करण्यात आलेला आहे. गुन्हयाच्या तपासाच्या अनुषंगाने देण्यात आलेल्या सूचना पोलिस दलाची प्रतिमा उंचावण्यासाठी केलेले प्रयत्न याबाबतही या मुलाखतीमध्ये सविस्तर चर्चा करण्यात जाती आहे. नागरिकांनी ही मुलाखत अवश्य पहावी असे आवाहन सह्याद्री वाहिनीतर्फे करण्यात आले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.