खिलाडी अक्षयकुमार बनला भारतीय नागरिक!
मुंबई : खरा पंचनामा
बॉलीवुडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमार याने आपल्या देशाच्या स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी सर्वांसोबत एक गोड बातमी शेअर केली आहे. अभिनेता अक्षय कुमार याला आता भारतीय नागरिकत्व मिळाले आहे.
या आधी अभिनेता अक्षय कुमारकडे कॅनडा या देशाचे नागरिकत्व होते. त्यामुळे अनेकांच्या रोषाला त्याला सामोरे जावे लागत होते. आता मात्र अभिनेता अक्षयमार हा पूर्णपणे भारतीय बनला असून त्याला केंद्रीय गृहमंत्रालयातर्फे भारतीय नागरिकत्व प्रदान करण्यात आले आहे.
याबाबत त्याने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. आता दिल भी और देश भी हिंदुस्थानी असे त्याने त्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.