अखेर आयपीएस अधिकारी सौरभ त्रिपाठी यांची पदस्थापना!
मुंबई : खरा पंचनामा
अंगडिया व्यापाऱ्यांकडून खंडणी उकळल्याप्रकरणी एलटी मार्ग पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात चर्चेत आलेले पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांना शिंदे सरकारने मोठा दिलासा दिला आहे. सौरभ त्रिपाठी यांचं निलंबन यापुर्वीच सरकाने मागे घेतले आहे. निलंबन मागे घेतल्यानंतर त्रिपाठी पदस्थापनेच्या प्रतीक्षेत होते. अखेर गृह विभागाने सौरभ त्रिपाठी यांच्या पदस्थापनेचे आदेश काढले असून त्यांची राज्य गुप्तवार्ता विभागात पदस्थापना करण्यात आली आहे.
हे आदेश महाराष्ट्र शासनाचे सह सचिव व्यंकटेश भट यांनी सोमवारी काढले आहेत.
अंगडिया प्रकरणात गेल्या वर्षी मार्च महिन्यात पोलीस उपायुक्त सौरक्ष त्रिपाठी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. यासंदर्भात मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्या अध्यक्षतेखाली उच्च स्तरीय समितीची स्थापना करण्यात आली होती. या समितीनं सौरभ त्रिपाठी यांच्यावरील निलंबनाची कारवाई मागे घेतली. आयपीएस अधिकाऱ्याला तीन महिन्यापेक्षा अधिक काळासाठी निलंबित ठेवता येत नाही. त्यामुळे ते मागेे घेेण्यात येत आहे, असं या समितीने निर्णय घेताना म्हटले होते.
पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांच्यावर करण्यात आलेली निलंबनाची कारवाई मागे घेण्यात आल्यानंतर त्यांची नियुक्ती करण्यात आली नव्हती. सोमवारी गृह विभागाने त्रिपाठी यांची उपायुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई येथे पदस्थापना केली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.