पालकमंत्रीपदाचा वाद, ध्वजारोहणाची यादी दुसऱ्यांदा बदलली!
मुंबई : खरा पंचनामा
राज्यात तीन पक्षांचे सरकार आहे. पण पालकमंत्री पद वाटपाबाबत वादामुळे पालकमंत्रीपदाचे वाटप केले गेले नाही. आता हाच वाद ध्वजारोहण समारंभासाठी पुन्हा उफाळला आहे. त्यामुळे १५ ऑगस्टच्या ध्वजारोहणाची यादी दोन वेळा बदलली आहे.
पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदासाठी अजित पवार इच्छुक आहेत. परंतु हा जिल्हा भाजपला हवा आहे. तोच वाद रायगडसाठी आहे. रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी शिवसेना आमदार भरत गोगावले आपला वारंवार दावा करत आहेत. यामुळे १५ ऑगस्टसाठी ध्वजारोहणाची यादी तयार केली गेली. त्यात रायगडला जिल्हाधिकारी ध्वजारोहण करणार होते. पुणे शहरात चंद्रकांत पाटील ध्वजारोहण करणार होते.
पालकमंत्रीपदाचा वाद टाळण्यासाठी दुसऱ्यांदा यादी बदलली. जुन्या यादीनुसार पुणे येथे चंद्राकांत पाटील ध्वजारोहण करणार होते. आता नवीन यादीनुसार चंद्रकांत पाटील रायगडमध्ये ध्वजारोहण करणार आहेत. पुण्यात राज्यपाल रमेश बैस ध्वजारोहण करणार आहे. यामुळे पुण्यात ना चंद्रकांत पाटील ना अजित पवार असा तोडगा काढला गेला आहे.
अमरावतीत छगन भुजबळ ध्वजारोहण करणार आहे. त्यासाठी राष्ट्रवादीकडून सुचवले गेले. परंतु हा निर्णय कायम राहिला. अजित पवार आता कोल्हापुरात ध्वजारोहण करणार आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.