राज्य उत्पादन शुल्कची नवी इमारत उदघाटनाच्या प्रतिक्षेत!
मुंबई : खरा पंचनामा
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कार्यालय सध्या ओल्ड कस्टम हाऊस येथे आहे. ती इमारत जीर्ण झाल्याने या विभागातील अधिकाऱ्यांसाठी मुंबई महापालिकेजवळ सुसज्ज इमारत उभारण्यात आली आहे. इमारत पूणर्पणे तयार झाली असून ती आता उदघाटन आणि अधिकाऱ्यांच्या प्रतीक्षेत आहे. इकडे सुसज्ज इमारत असतानाही मुंबईत काही ठिकाणी या विभागाच्या अधिकाऱ्यांना कंटेनरमधून कारभार हाकत असल्याचे चित्र आहे.
वांद्रे पूर्व येथे उत्पादन शुल्कच्या तीन विभागाची कार्यालये होती. २०१७ मध्ये उड्डाणपुलासाठी ती पाडण्यात आली. त्यानंतर त्याच जागेत या कार्यालयांचा कारभार कंटेनरमधून केला जात आहे. एकीकडे अधिकाऱ्यांसाठीची सुसज्ज इमारत असतानाही काही अधिकाऱ्यांना कंटेनरचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे या कार्यालयांचा प्रश्न सुटणार कधी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
राज्य उत्पादन शुल्कचे तत्कालीन आयुक्त श्री. कांतीलाल उमाप यांच्या कार्यकाळात नवीन इमारत उभारण्यात आली आहे. त्यावेळी महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत होते. सध्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडेच राज्य उत्पादन शुल्कचे मंत्रीपदही होते. त्यावेळी त्यांनी केवळ आयुक्त कार्यालयच नव्हे राज्यातील अनेक जिल्ह्यातील अधीक्षक कार्यालयांचे आराखडे तयार करून त्यांच्या बांधकामालाही मंजुरी दिली होती. मात्र बहुतांशी जिल्ह्यातील अधीक्षक कार्यालयाचे कामही सध्या रखडल्याचे चित्र आहे. त्यामुळे मुंबईतील आयुक्त कार्यालयाचे तातडीने उदघाटन करण्याची गरज आहे. शिवाय वांद्रे येथील कंटेनरमध्ये असलेली कार्यालयेही चांगल्या इमारतीत हलवण्याची गरज आहे. मात्र याकडे सध्या तरी राज्यकत्यार्चे दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.