अजित पवार यांना तिहार जेलमध्ये जायचं नव्हतं!
सोलापूर : खरा पंचनामा
अजित पवार यांना तिहार जेलमध्ये जायचे नसेल. तर त्यामुळे त्यांना भाजपसोबत जाणं भाग होतं, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. शालिनीताई पाटील यांच्या प्रश्नाचं खंडण अजितदादा यांनी केलं नाही. उदाहरणं बोलकं आहे. त्यामुळे अमित शहा यांना यश का येते यातून कळत आहे, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. शरद पवार हे सिनियर आहेत. वयोवृद्ध पुढारी आहेत. मात्र आता त्यांच्याकडे काय राहिलं आहे?, असा सवालही आंबेडकरांनी केला आहे.
संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याबाबत आक्षेपार्ह टिपण्णी केली. त्यावरही प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
संभाजी भिडेंवर कारवाई होणार नाही. कारण पंतप्रधान त्यांच्या पाया पडतात. त्यामुळे कोण पोलिस त्यांच्यावर कारवाई करणार नाहीत, असा घणाघात त्यांनी केला. ज्यांना वाटतंय की महात्मा गांधी यांचा अपमान झाला. त्यांनी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी पक्षाच्या आमदार यांच्या घराबाहेर जाऊन धरणे आंदोलन करावं. सरकारमध्ये तेच बसलेत. त्यामुळे त्यांच्याविरोधात आंदोलन करावं, असं आंबेडकरांनी म्हटलं आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.