सांगली जिल्हा कारागृहात तीनशेवर बंदींना बांधली राखी
सांगली : खरा पंचनामा
बहीण-भावांमधील प्रेमाचे नाते दृढ करणारा पवित्र रक्षाबंधन सण आज उत्साहात साजरा झाला. येथील जिल्हा मध्यवर्ती कारागृहात साडेतीनशेवर बंदीना राखी बांधत बंधुत्वाचे नाते रुजविण्याचा उपक्रम साजरा झाला.
प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय व इनरव्हिल क्लब मिरज यांच्यातर्फे हा उपक्रम घेण्यात आला. कारागृहातील साडेतीनशे बंदीना राखी बांधली. त्यांचे प्रबोधनही करण्यात आले. प्रजापिता ब्रह्माकुमारीच्या स्वाती बहेनजी, उर्मिला दिदी, किशोरभाई शितोळे, इनरव्हिलच्या डॉ. सोनाली मगदूम यांनी मार्गदर्शन केले. बंदीनी कारागृहात तसेच येथून बाहेर आल्यानंतर चांगले आचरण ठेवावे. उर्वरित आयुष्य सुखासमाधानाने जगावे. बहिणीच्या रक्षणाबरोबर समाजाचे रक्षण करण्याची जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
कारागृह अधीक्षक विवेक झेंडे, अस्लम शेख, जयवंत शिंदे, सुबोध चव्हाण, मनोज जाधव, विक्रम कवडे, बी. एस. पवार, सचिन रणदिवे, सागर पुजारी यांच्यासह कारागृहातील कर्मचारी उपस्थिती होते. यावेळी बंदीना राखी बांधून मिठाई वाटण्यात आली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.