विद्यार्थिनींना पोलिस दलात करियरसाठी खूप वाव : महानिरीक्षक फुलारी
मिरजेत न्यू इंग्लिश स्कुलच्या विद्यार्थिनींनी सीमेवरील जवानांना पाठवल्या राख्या
मिरज : खरा पंचनामा
सोशल मीडियावर अनेक अल्पवयीन मुलींची विविध प्रकारे फसवणूक केली जात आहे. त्यामुळे मुलींनी सोशल मीडियाच्या नादी लागू नये. मुलींसाठी पोलिस दलात करियर करण्यासाठी खूप वाव आहे. त्यामुळे मुलींनी पोलिस दलात यावे, असे आवाहन कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी केले.
मिरजेतील न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थिनींकडून देशाच्या सीमेवरील जवानांना पाठविण्यात राख्या आल्या. या कार्यक्रमात श्री. फुलारी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, महापालिका उपायुक्त स्मृती पाटील, चैतन्य एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर आप्पासाहेब चव्हाण, प्रशासकीय अधिकारी दिग्विजय चव्हाण, पोलिस उपअधीक्षक प्रणिल गिलडा, न्यू इंग्लिश स्कुल माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष डॉ. विनोद परमशेट्टी, आशादीप विशेष शाळेच्या मुख्याध्यापिका सतनामकौर चड्डा, विद्यार्थी आदी उपस्थित होते.
लष्करी जवानांना रक्षाबंधन व बहीण भावातील नात्याची उणीव भासू नये या हेतूने न्यू इंग्लिश स्कूलतर्फे आशादीप विशेष शाळेच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण राख्या आणि पोस्टकार्ड यांचे केलेले संकलन महानिरीक्षक फुलारी यांच्यासह प्रमुख पाहुण्यांकडे सुपूर्द करण्यात आले. या राख्या आणि पोस्टकार्ड सीमेवरील जवानांना पाठवण्यात येणार आहेत.
यावेळी पोलिस अधीक्षक डॉ. तेली, उपायुक्त श्रीमती पाटील आदींची भाषणे झाली. प्रशासकीय अधिकारी दिग्विजय चव्हाण यांनी स्वागत केले. डॉ. विनोद परमशेट्टी यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी माजी विद्यार्थी संघटनेचे प्रभात हेटकाळे, अतिश अग्रवाल, डॉ विकास पाटील, बाबासाहेब आळतेकर, डॉ सूर्यकांत व्हावळ, मिलिंद अग्रवाल, डॉ रणजीत चिडगुपकर, मंदार वसगढेकर, बाळासाहेब लिपाणे-पाटील, रवी शेळके, अंकुश कोळेकर, प्रकाश भंडारे, संजय कानडे, संदीप पितळे, चैतन्य एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष नंदकुमार आप्पासाहेब चव्हाण, माध्यमिक मुख्याध्यापक अरुण माने, प्राथमिक मुख्याध्यापिका उज्वला भुईंगडे शिक्षक-शिक्षिका, माजी विद्यार्थी, शाळेचे कर्मचारी उपस्थित होते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.