Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण : पोलिसावर गुन्हा दाखल

अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण : पोलिसावर गुन्हा दाखल



नालासोपारा : खरा पंचनामा

पोलिसाकडूनच अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार नालासोपाऱ्यात उघडकीस आला आहे. संशयित पोलीस नालासोपारा येथे पोलीस भरती प्रशिक्षणाचे क्लासेस चालवत होता. दोन पीडित मुलींनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलीस आणि त्याच्या मैत्रिणीविरोधात विनयभंग तसेच पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून दोन्ही संशयितांना अटक केली आहे.

संशयित समाधान गावडे (वय २८) आणि त्याची २५ वर्षीय मैत्रीण वसई रेल्वे पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. गावडे हा नालासोपारा येथे विजयी भव नावाची पोलीस अकादमी चालवतो. त्याच्यावर क्लासेला येणाऱ्या मुलींचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी दोन पीडित मुलींनी नालासोपारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. गावडे हा मुलींना अश्लील मेसेजेस पाठवता होता तसेच व्हिडियो कॉल करून अश्लील कृत्य करत होता.

शिकविण्याच्या नावाखाली तो या मुलींच्या शरिराला हेतुपुरस्सर चुकीच्या ठिकाणी हात लावत होता. अनेकदा मुलींचा पाठलाग करत त्यांच्या घरी जायचा तसेच त्यांना फिरायला बोलवत होता. त्याच्या मैत्रिणीने या कृत्याला पाठिंबा दिल्याचा आरोप आहे. तिने एका पीडित मुलीचे व्हॉटसप स्कॅन करून गावडे बरोबर आक्षेपार्ह संभाषण केले होते. या प्रकारामुळे पीडित मुलींनी क्लासमध्ये जाणे बंद केले.

पीडित मुलींनी मानसिक त्रास झाल्याने त्यांनी आपल्या कुटुंबियांना हा प्रकार सांगितला. बुधवारी नालासोपारा पोलीस ठाण्यात संशयित पोलीस समाधान गावडे आणि त्याची मैत्रीण या दोघांविरोधात विनयभंग, बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०२२ च्या (पोक्सो) तसेच माहिती तंत्रज्ञान (सुधारणा) अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.