Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे पांढऱ्या कपड्यातील टगे!

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे पांढऱ्या कपड्यातील टगे!



सांगली : खरा पंचनामा

युतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष, माजी मंत्री महादेव जानकर यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यावर टीका केली आहे. मुख्यमंत्री आणि उप मुख्यमंत्री यांच्याकडे पांढऱ्या कपड्यांमधील टगे असल्याचा उल्लेख केला. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे सर्वसामान्य माणूस असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

जानकर यांनी सांगली लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी विटा येथे पत्रकारांशी संवाद साधला. जानकर म्हणाले, पक्षवाढी प्रमाणे भाजपची गुर्मीही वाढली असून देवेंद्र फडणवीसांची भाजप लवकरच गुंडाळून जाईल. तर गावागावातील चष्मा व पांढरे कपडे घालून फिरणारे गावातील टगे हे एकनाथ शिंदे आणि अजित पवारांबरोबर गेले आहेत. कॉमन मॅन हा उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या सोबत आहे.

तसेच आगामी निवडणुकांमध्ये आपण कोणाबरोबरही जाणार नाही. स्वबळावरच निवडणुका लढवण्याची तयारी सुरू आहे. सांगलीची लोकसभा निवडणुकीत देखील राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर लढवणार असल्याचं महादेव जानकर यांनी स्पष्ट केला आहे. महादेव जानकर यांनी यावेळी भाजपाच्या कार्यपद्धतीवर टीका केली. छोटे पक्ष संपवण्यासाठी भाजप प्रयत्न करत असल्याचंही ते म्हणाले.

भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी अशा मोठ्या पक्ष विस्कळीत झाले आहेत. त्याचा फायदा इतर लहान पक्षांनाही होणार आहे. लहान पक्षांना चांगले दिवस येणार आहेत. पण कुणाचे वाटोळे व्हावे आणि कुणाचे चांगले व्हावे, असे म्हणण्याचा आम्हालाही अधिकार नाही, असही जानकरांनी स्पष्ट केलं.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.