सांगलीत घरफोडी करणाऱ्यास अटक!
सांगली : खरा पंचनामा
कुपवाड एमआयडीसीमध्ये घरफोडी करून रक्कम लंपास करणार्या चोरट्यास संजयनगर पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून 2.95 लाखांची रोकड जप्त करण्यात आली.
सुरज बाळकृष्ण धामणे (वय 26, रा. दुर्गानगर, ता. मिरज) असे त्याचे नाव आहे. कुपवाड एमआयडीसी येथे राहणारे मारुती पांढरे यांचे बंद घर फोडून चोरट्याने घरातून तीन लाख रुपयांची रोकड लंपास केली होती. या चोरीबाबत कुपवाड एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
शुकवार (दि. 25) रोजी रात्री संजयनगर पोलिस लक्ष्मी मंदीराजवळ नाकाबंदी करीत होते. त्यावेळी पाठीवर सॅक अडकवून सूरज धामणे हा चालत येत असल्याचे पोलिसांना आढळून आले. पोलिसांना पाहताच सूरज धामणे याचे धाबे दणाणले, कावराबावरा झालेल्या धामणे याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता सॅकमध्ये दोन लाख 95 हजार रुपये मिळून आले. रकमेबाबत त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने कुपवाड एमआयडीसीमध्ये घरफोडीकरून पैसे चोरल्याची कबुली दिली. चोरलेल्या रकमेपैकी पाच हजार रुपये त्याने खर्च केले असल्याची कबुली दिली आली आहे. याबाबत संयजनगर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.