सुट्टे ६ रुपये परत न केल्याने रेल्वे क्लर्कने गमावली नोकरी!
मुंबई : खरा पंचनामा
भ्रष्टाचार निर्मूलन पथकाच्या निर्देशानुसार बनावट प्रवासी बनून रेल्वेचं तिकीट खरेदी करण्यासाठी गेलेल्या आरपीएफ जवानाचा सापळा यशस्वी झाला. या जवानाने तिकीट काऊंटवरुन तिकीट खरेदी केले, त्यासाठीचे पैसेही दिले. मात्र, तिकीट खरेदीचा व्यवहार झाल्यानंतर बाकी राहिलेले ६ रुपये तिकीट क्लर्कने परत केले नाहीत. त्यामुळे, या क्लर्कला आपली नोकरी गमावावी लागल्याची घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे मुंबई उच्च न्यायालयानेही या क्लर्कला दिलासा देण्यास नकार दिला.
उच्च न्यायालयात संबंधित क्लर्कने बाजू मांडताना म्हटले की, तिकीट बुकींग कार्यालयात सुट्टे पैसे नव्हते. त्यामुळे, संबंधित प्रवाशाला ६ रुपये परत दिले नाहीत. त्यावर, न्यायालयाने क्लर्कला चांगलंच सुनावल. जर तिकीटासाठी जादा घेतलेले पैसे देण्यासाठी सुट्टे पैसे नव्हते, त्यावेळी, संबंधित प्रवाशाला बाजुला उभे करायला हवे होते. त्यानंतर, ६ रुपये चिल्लर किंवा सुट्टे पैसे जमा होताच ते परत करणे आवश्यक होते, असे न्यायालयाने म्हटले आहे.
न्यायालयाकडे सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांमध्ये आणि पुराव्यांमध्येही तसा कुठलाही पुरावा दिसून येत नाही. ज्याद्वारे हे सिद्ध होईल की, प्रवाशाचे ६ रुपये परत करण्याची इच्छा क्लर्कची होती. विशेष म्हणजे या क्लर्कवर लावण्यात आलेले आरोप सबळ पुराव्यानिशी सादर करण्यात आले आहेत. त्यामुळे, उच्च न्यायलयानेही संबंधित क्लर्कबाबत २००४ मध्ये कॅट न्यायलायाने दिलेला आदेश कायम ठेवला आहे. तसेच, क्लर्कची याचिका फेटाळून लावली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.