सांगलीतील लाकूड व्यापाऱ्याकडून लाच घेताना हातकणंगलेत वनपाल जाळ्यात!
कोल्हापूर : खरा पंचनामा
जळाऊ लाकडांच्या वाहतूक परवान्यावर तसेच गाडीवर कोणतीही कारवाई न करणेसाठी वीस हजाराची लाच घेताना हातकणंगले वनाधिकारी कार्यालयातील दोघा वनपालना कोल्हापूर लाचलुचपत विभागाने सापळा रचून ताब्यात घेतले आहे.
रॉकी केतन देसा (पद : वनपाल नेमणूक : प्रभारी परिमंडळ वनाधिकारी कार्यालय, हातकणंगले, वनविभाग प्रादेशिक, रा. बाचणी, ता. कागल, जि. कोल्हापूर), मोहन आत्माराम देसाई (पद : वनरक्षक, नेमणूक : हातकणंगले परिमंडळ वनाधिकारी कार्यालय, हातकणंगले. रा. सुलोचना पार्क, प्लॉट नं. १४, ए वार्ड, नवीन वाशीनाका,कोल्हापूर,मुळ रा.कडगाव, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर) अशी लाच घेणाऱ्यांची नावे आहेत.
सांगली जिल्ह्यातील तक्रारदार यांचा जळाऊ लाकडांचा खरेदी विक्रीचा व्यापार असून तक्रारदार हे जत (सांगली), सांगोला (सोलापूर) येथून जळावू लाकूड खरेदी करून ते भाड्याने घेतलेल्या गाड्यांमध्ये भरून कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तसेच इचलकरंजी येथे आले होते. या ठिकाणी आल्यानंतर भाड्याने घेतलेल्या गाड्या मधील लाकडाची तपासणी न करण्यासाठी तसेच त्या वाहनातील जळावू लाकडांच्या वाहतूक परवान्यावर कारवाई न करण्यासाठी तसेच त्या गाड्यावर कोणतीही कारवाई न करणेसाठी रॉकी केतन देसा व मोहन आत्माराम देसाई यांनी स्वतः साठी तक्रारदार यांचेकडे २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तसेच देसा यांनी ती रक्कम मोहन देसाई यांचेकडे देण्यास सांगितले.
त्यानंतर देसाई यांनी तक्रारदार यांचेकडून २० हजाराची लाच रक्कम स्वतः स्वीकारल्यानंतर त्यांना रंगेहात पकडण्यात आले असून दोघांच्या विरुद्ध हातकणंगले पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.