Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पुरूष, महिला गटात पोलिस मुख्यालयाला सर्वसाधारण विजेतेपद सांगलीत ३७ वी जिल्हा पोलिस क्रीडा स्पर्धा उत्साहात

पुरूष, महिला गटात पोलिस मुख्यालयाला सर्वसाधारण विजेतेपद
सांगलीत ३७ वी जिल्हा पोलिस क्रीडा स्पर्धा उत्साहात



सांगली : खरा पंचनामा

सांगलीतील पोलिस मुख्यालयात नुकत्याच ३७ वी जिल्हा पोलिस क्रीडा स्पर्धा उत्साहात पार पडली. या स्पर्धेत जिल्ह्यातील सात विभागातील खेळाडूंनी भाग घेतला होता. यावेळी पुरूष आणि महिला गटात मुख्यालयाला सर्वसाधारण विजेतेपद मिळाले. जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्याहस्ते विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली उपस्थित होते. 

पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर या स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत मुख्यालय, सांगली, मिरज, जत, तासगाव, विटा, इस्लामपूर विभागातील १५० पुरूष आणि ५० महिला खेळाडूंनी भाग घेतला. या स्पधेर्त सर्वोत्कृष्ट पुरूष खेळाडू म्हणून अविनाश लाड तर सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू म्हणून सीमा यादव यांनी बहुमान पटकावला. या स्पर्धेत एथलेटिक्स, कबड्डी, जलतरण, बॉक्सिंग, कुस्ती, ज्यूदो, व्हॉलीबॉल, खो-खो, फुटबॉल, हॉकी, वेटलिफ्टिंग, तायक्वांदो, हँडबॉल, आदी १४ खेळ प्रकार घेण्यात आले. 

यावेळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक तुषार पाटील, सांगलीचे उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव, मिरजेचे उपअधीक्षक प्रणिल गिल्डा, इस्लामपूरचे उपअधीक्षक मंगेश चव्हाण, तासगावचे उपअधीक्षक सचिन थोरबोले, विट्याच्या उपअधीक्षक पद्मा कदम, जतचे उपअधीक्षक सुनील साळुंखे, एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे यांच्यासह सर्व पोलिस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते. 

राखीव निरीक्षक पांडुरंग सूर्यवंशी, उपनिरीक्षक मणिलाल पवार, स्पोर्ट्स इनचार्ज सुभाष सूर्यवंशी, विठ्ठल भोसले, गणेश बामणे, समीर सनदी, निवास माने, सचिन कनप आदींनी संयोजन केले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.