Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

बनावट कागदपत्रांद्वारे शासनाची फसवणूक : पोलिसावर गुन्हा

बनावट कागदपत्रांद्वारे शासनाची फसवणूक : पोलिसावर गुन्हा



पुणे : खरा पंचनामा

भुकंपग्रस्त नसताना बनावट कागदपत्रे सादर करुन भुकंपग्रस्त कोट्यातून पोलीस भरती होऊन शासनाची फसवणूक केलेल्या पोलीस शिपायावर गुन्हा दाखल केला आहे. गोविंद मधुकर इंगळे  असे गुन्हा दाखल झालेल्या पोलीस शिपायाचे नाव आहे. सध्या त्याची नेमणूक शिवाजीनगर मुख्यालयात आहे.

याबाबत सहायक पोलीस निरीक्षक प्रविण अब्दागिरे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात  फिर्याद दिली आहे. हा प्रकार ऑक्टोबर २०२१ पासून घडला आहे. ऑक्टोबर २०२१ मध्ये शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात पोलीस शिपाई भरती घेतली होती. त्यात गोविंद इंगळे याने भुकंपग्रस्त कोट्यातून अर्ज केला होता. त्यात त्याची निवड झाली.

त्याच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात आल्यावर त्याने बनावट कागदपत्र सादर करुन भुकंपग्रस्त कोट्यातून नोकरी मिळविल्याचे दिसून आल्यावर शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.