रतन टाटा यांना महाराष्ट्राचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार प्रदान!
मुंबई : खरा पंचनामा
प्रसिद्ध उद्योगपती, टाटा समूहाचे प्रमुख रतन टाटा यांचा आज महाराष्ट्राचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन हा पुरस्कार दिला. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत या पुरस्कारची घोषणा केली होती.
महाराष्ट्र भुषण पुरस्काराच्या धरतीवर या वर्षीपासून 'उद्योगरत्न पुरस्कार' देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्यानुसार हा पुरस्कार देण्यात आला. यंदापासून या पुरस्काराची सुरुवात झाली. हा राष्ट्रीय स्तरावरचा पुरस्कार आहे. महिला उद्योजिका, मराठी उद्योजक आणि अन्य एकाला असे तीन पुरस्कार पण देण्यात येणार आहेत. रतन टाटा यांचे सामाजिक आणि उद्योगातील मोठे योगदान आहे. त्यांच्या कार्याचा गौरव हा पुरस्कार देऊन करण्यात आला आहे.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्योपती रतन टाटा यांना हा पुरस्कार देण्यात आला. टाटा यांच्या निवासस्थानी हा कार्यक्रम झाला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री उदय सामंत, पालकमंत्री दीपक केसरकर हे उपस्थित होते. सन्मानचिन्ह, मानपत्र आणि 25 लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.