वय पूर्ण व्हायच्या एक दिवस आधी केला वृद्धेचा खून!
लिव्ह इन पार्टनरला जेलमधून सोडवण्यासाठी अल्पवयीनाचे कृत्य
पिंपरी : खरा पंचनामा
लिव्ह इन पार्टनर जेलमध्ये आहे. तिला जामीन मिळवून देण्यासाठी पैशाची आवश्यकता असल्याने वृद्ध महिलेचा खून करून तिचे दागिने चोरून नेले. एका सराईत अल्पवयीन गुन्हेगाराने हा खून केला. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे आज मंगळवारी त्याचे 18 वर्षे वय पूर्ण झाले आहे. वय पूर्ण व्हायच्या आधी त्याने हे कृत्य केले.
शालूबाई रूपा साळवी (वय ८५, रा. पिंपरी) असे मृत महिलेचे नाव आहे. संशयित अल्पवयीन असून बुधवारी तो १८ वर्षाचा होणार आहे. तो सराईत असून त्याच्यावर तब्बल ११ गुन्हे दाखल आहेत.
ही घटना ३० जुलै ते ३१ जुलै दरम्यान सेनेट्री चाळ, भाजी मंडळीजवळ, पिंपरी येथे घडली. या प्रकरणी वृद्धेची नात सुनिता भिमराव कांबळे (वय ४८ रा. पिंपळे गुरव) यांनी शनिवारी (दि.५) पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शालूबाई साळवी या एकट्याच राहत होत्या. त्याचा फायदा घेऊन त्याच परिसरात राहणाऱ्या संशयिताने घराचा सिमेंटचा पत्रा उचकटून घरात प्रवेश केला. शालूबाई यांना कोणत्यातरी कठीण वस्तूने डोक्यात मारून जीवे खून केला. त्यानंतर त्यांच्या अंगावरील व घरात असलेल्या कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने, मोबाइल हँडसेट आणि गॅस सिलेंडर एक लाख चार हजार ५०० रुपयांचा माल चोरून नेला.
त्याला पकडण्यासाठी पोलिसांची दोन पथके तयार करण्यात आली होती. पोलिसांनी चौकशी केली असता मृत वृद्धेच्या परिसरात राहणारा आणि गुन्हेगारी पार्श्वभुमी असेलेला एक अल्पवयीन खूनाच्या घटनेनंतर त्या भागात दिसला नसल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्याला सोमवारी अटक केली. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबूली दिली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.