शरद पवार यांना निवडणूक आयोगाकडून दिलासा!
नवी दिल्ली : खरा पंचनामा
राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक, राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना केंद्रीय निवडणूक आयोगाकडून दिलासा मिळाला आहे. निवडणूक आयोगाने तीन आठवड्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांना नोटीस पाठवली होती.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 30 जुलैला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षाच्या चिन्हावर दावा सांगितला होता. अजित पवार यांनी निवडणूक आयोगाला पत्र पाठवून याबाबत भूमिका मांडली होती. त्यानंतर निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना नोटीस पाठवली होती. या नोटीसमध्ये दोन्ही गटांना पक्षावर दावा सांगणारे कागदपत्रे सादर करण्याचा आदेश दिला होता. यासाठी तीन आठवड्यांची मुदत देण्यात आली होती. ही मुदत उद्या संपणार आहे.
शरद पवार यांच्या गटाने निवडणूक आयोगाला ई-मेल पाठवून कागदपत्रे सादर करण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत वाढवून देण्याची विनंती केली होती. त्यावर निवडणूक आयोग काय निर्णय घेतं, याकडे अनेकांचं लक्ष होतं. विशेष म्हणजे निवडणूक आयोगाने शरद पवार गटाची विनंती मान्य केली आहे. त्यामुळे शरद पवार गटाला काहीसा दिलासा मिळाला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.