पीआयसाठी लाच मागणाऱ्या पोलिसावर गुन्हा दाखल
नाशिक : खरा पंचनामा
हद्दपार आणि एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई न करण्यासाठी पोलीस निरीक्षक यांच्यासाठी एक लाख रुपये लाच मागणाऱ्या शिर्डी पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदारावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.
संदिप गडाख (वय 40) असे गुन्हा दाखल केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. तक्रारदार यांच्या विरुद्ध शिर्डी पोलीस ठाण्यात आयपीसी 354 चा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात मदत करण्यासाठी तसेच त्यांच्यावर हद्दपार व एमपीडीए कायद्यानुसार कारवाई न करण्यासाठी संदिप गडाख याने 15 जुन रोजी पोलीस निरीक्षक दुधाळ यांच्यासाठी 1 ते दीड लाख रुपये लाचेची मागणी केली. तडजोडीअंती 30 हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले.
तक्रारदार यांनी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. पथकाने पडताळणी केली असता संदिप गडाख यांनी तक्रारदार यांच्याकडे पोलीस निरीक्षक दुधाळ यांच्यासाठी लाचेची रक्कम मागितल्याचे निष्पन्न झाले. तसेच तडजोडी अंती ठरलेली 30 हजारांची रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर 26 जुलै रोजी गडाख यांनी पोलीस निरीक्षक दुधाळ यांच्यासाठी एक लाख रुपये लाचेची मागणी करुन स्वीकारण्याची तयारी दर्शवल्याने एसबीने संदिप गडाख यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.