वनविभागाच्या परीक्षेत कॉपी : सांगलीत एकाला अटक!
सांगली : खरा पंचनामा
सांगलीत झालेल्या वनविभागाच्या शिपाई पदासाठीच्या भरती परीक्षेत कॉपी करणाऱ्या दोघांना रंगेहात पकडण्यात आले. वनविभागाच्या पथकास हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली. तर कॉपी करणाऱ्या एकास अटक केली आहे. गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली.
याप्रकरणी युवराज पाटील यांनी विश्रामबाग पोलिसात फिर्याद दिली. अविनाश संजनसिंग गुमलाडू (रा. शिवगाव) आणि अर्जुन रतन नार्डे (रा. संजरपूर जि. औरंगाबाद) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. तर याप्रकरणी अविनाश गुमलाडू याला अटक करण्यात आली आहे. सांगलीतील वसंतदादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडी अँड रिसर्च या कॉलेजमध्ये वनविभागाच्या शिपाई पदासाठीच्या भरतीची परीक्षा गुरुवारी होती. पेपर सुरु झाल्यानंतर संशयित अविनाश गुमलाडू हा त्याच्या बुटामध्ये मोबाईल लपवून ठेऊन केसातून मोबाईल ब्ल्यूटुथ हेडफोन लपवून कॉपी करत पेपर लिहीत होता.
मोबाईलवरून औरंगाबाद जिल्ह्यातील दुसरा संशयित अर्जुन नार्डे हा उत्तरे देत होता. यावेळी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब आली. त्यांनी अविनाश याची कसून तपासणी केली असता त्याच्याकडे बनेन, मायक्रोफोन, मोबाईल, सॅंडल जोड, डिव्हाईस असा ३ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल आढळला. या दोघांविरोधात परीक्षांमध्ये होणाऱ्या गैरप्रकारास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल केला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.