बंडानंतर काका-पुतण्या एकत्र : काकांनी उल्लेखही केला!
पुणे : खरा पंचनामा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुण्यात लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांचीही उपस्थिती होती. राष्ट्रवादीत झालेल्या बंडानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार हे काका-पुतण्या पहिल्यांदाच सार्वजनिक कार्यक्रमाच्या व्यासपीठावर एकत्र आले. यावेळी भाषण करताना पवारांनी अजित पवारांचा उल्लेखही केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या या लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराच्या कार्यक्रमावेळी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार एकाच व्यासपीठावर आल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष त्यांच्याकडे लागले होते. यावेळी बोलायला उभे राहिल्यानंतर, शरद पवार यांनी, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, असे म्हणत त्यांनी आपल्या भाषणाला सरुवात केली.
छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा इतिहास जगाला माहिती आहे. शिवरायांचा जन्म याच जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला आणि इथल्याच लाल महालात त्यांचं बालपण गेलं. हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेला सुरुवात झाली, याकडे शरद पवार यांनी लक्ष वेधल.
पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत भाजप, शिवसेना आणि अजित पवार गट यांची एकत्र उपस्थिती पाहायला मिळाली. शरद पवार यांच्यासह विरोधकांनी मोदींच्या विरोधात इंडिया आघाडीची स्थापना केल्यानंतर पवार- मोदी पहिल्यांदाच एका मंचावर येणं महत्त्वाचं मानलं जात.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.