Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मराठा आरक्षणासाठी कायदाच हवा! भाजप, अजित पवारांकडून दिशाभूल : चव्हाण

मराठा आरक्षणासाठी कायदाच हवा! 
भाजप, अजित पवारांकडून दिशाभूल : चव्हाण 



सांगली : खरा पंचनामा 

मराठा आरक्षणासाठी दिल्लीत कायदामंत्र्यासोबत बैठका व्हायला हव्यात. ५० टक्के मर्यादा असेपर्यंत आरक्षण मिळणार नाही, हे अजित पवारांनाही माहिती आहे. पण दिशाभूल सुरु आहे. कायदा केल्याशिवाय आरक्षण मिळणार नाही, असे मत माजी मुख्यमंत्री, काँग्रेसचे आमदार अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले. 

राज्यात दंगली घडवून निवडणुकीचे वातावरण तयार करण्याचे काम सुरु आहे. सत्तेसाठी फोडा आणि झोडा कार्यक्रम राबवला जात आहे. आत्मविश्वास नसलेले स्थगिती सरकार सत्तेवर असल्याची टीका माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली. चव्हाण म्हणाले, २०० आमदार असताना भाजपला फोडाफोडीची गरज काय? असा प्रश्न आहे. 

सरकारला बहुमत असूनही आत्मविश्वास नाही. आगामी निवडणुकीत अन्य पक्षांच्या सोबतीशिवाय जिंकता येणार नाही अशीच भाजपची भावना झाली आहे. राज्यात इतके मंत्री असतानाही स्वातंत्र्यदिनी झेंडावंदनाला मंत्री मिळाले नाहीत. अनेक ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनीच ध्वजवंदन केले. भाजपकडे गेलेल्यांना 'आपण का इकडे आलो? असे वाटत आहे, अशी टीकाही चव्हाण यांनी केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.