खड्डेच बघायचे आहेत, त्यापेक्षा महाराष्ट्रात यान सोडलं असतं तर खर्चही वाचला असता!
पनवेल : खरा पंचनामा
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पनवेलमध्ये कोकणातील पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात करण्यात आला होता. या मेळाव्यात अध्यक्ष राज ठाकरे यांनी सत्ताधारी आणि विरोधकांवर त्यांच्या खास शैलीत हल्लाबोल केला.
चंद्रयान चंद्रावर जाऊन काय उपयोग, तिथे जाऊन खड्डेच बघायचे आहेत, त्यापेक्षा यान महाराष्ट्रात सोडलं असतं तर खर्चही वाचला असता,” असा खोचक टोला राज ठाकरे यांनी मुंबई- गोवा महामार्ग, तसेच नाशिकमधील रस्त्यांच्या अवस्थेवरुन लगावला आहे. यावेळी त्यांनी भाजप, राष्ट्रवादी, ठाकरे गटावर जोरदार निशाणा साधला.
भाजपने दुसऱ्यांचे आमदार न फोडता पक्ष उभा करायलाही शिकावे, असा हल्लाबोल त्यांनी केला. तर खोके खोके ओरडणाऱ्यांकडे कंटेनर आहेत, असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. मुंबई-गोवा महामार्गप्रश्नी आता मनसे आक्रमक झाली आहे. गणपतीत कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर करण्यासाठी आता मनसे मैदानात उतरली आहे. या मेळाव्यात प्रलंबित मुंबई-गोवा महामार्गा संदर्भात आंदोलनाची हाक देण्यात आली. असे आंदोलन करा की, यापुढे रस्ते करताना सरकारला अशाप्रकारे आंदोलन झालं होतं अशी भीती असावी, दहशत असावी, असे म्हणत राज ठाकरे यांनी या आंदोलनाला हिरवा कंदिल दाखवला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.