पुण्यात दीड कोटींचे परकीय चलन जप्त!
पुणे : खरा पंचनामा
केंद्रीय सीमा शुल्क विभागाच्या (कस्टम) पथकाने पुणे विमानतळावर दीड कोटी रुपयांचे परकीय चलन जप्त केले आहे. याप्रकरणी चार जणांना ताब्यात घेण्यात आले. प्रोफाइलिंगच्या आधारे दोन वेगवेगळ्या प्रकरणात हे परकीय चलन सीमा शुल्क विभागाने जप्त केले आहे.
सीमा शुल्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 25 जुलै रोजी पुण्याहून दुबईला जाणाऱ्या एका प्रवाशाला ताब्यात घेत त्याच्याकडून 9 लाख 22 हजार रुपये किमतीचे संयुक्त अरब अमीरात दिरहाम हे विदेशी चलन जप्त केले.
दुसरी कारवाई 31 जुलै रोजी करण्यात आली. यामध्ये दुबईला जाणाऱ्या तीन प्रवाशांना ताब्यात घेत त्यांच्याकडून 1 कोटी 41 लाख 11 हजार 578 किमतीचे संयुक्त अरब अमिराती दिरहम चलन जप्त करण्यात आले. या प्रवाशांनी मर्यादेपेक्षा जास्त रक्कमेचे परकीय चलन जवळ बाळगले होते. त्यामुळे सीमा शुल्क विभागाने (कस्टम) ही कारवाई केली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.