काँग्रेस आमदाराच्या अंगावर ट्रक घालून मारण्याचा प्रयत्न!
मुंबई : खरा पंचनामा
काँग्रेस आमदाराने त्याला जीवानिशी संपवण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप केला आहे. हा आमदार महाराष्ट्र विधान परिषदेवर काँग्रेसच प्रतिनिधीत्व करतो. तीन वर्षांपूर्वी काँग्रेसने त्यांना विधान परिषदेवर पाठवलं आहे.
राजेश राठोड असं या आमदाराच नाव आहे. नाशिक-पुणे मार्गावर राजेश राठोड यांच्या वाहनावर ट्रक घालण्याचा प्रयत्न झाला. ते मुंबईहून जालन्याकडे चालले होते. त्यावेळी त्यांना मारण्याचा प्रयत्न झाला. वेल्हे ते पिंपळनेर भिवंडी हद्दीत ही घटना घडली.
राजेश राठोड यांनी व्हिडीओ प्रसारित करुन ही माहिती दिली. राजपूत भामटा बोगस जात प्रमाणपत्र प्रकरण राजेश राठोड यांनी लावून धरले होते. राजेश राठोड यांना करणी सेनेकडून काही दिवसांपूर्वी धमकी देण्यात आली होती.
"मुंबई येथून नाशिकमार्गे औरंगाबाद-जालना प्रवासाला सुरुवात केली. वेल्हे ते पिंपळनेर दरमयान ट्रॅफीक जाम असतं. वाहनामध्ये असताना, एका मोठा टँकर ट्रक त्याचा नंबर संबंधित पोलिसांना देणार आहे. अचानक भरधाव ट्रक माझ्या गाडीवर चालून आला. पाच ते सहा मिनिटाचा पाठलाग करुन गाडी आडवी लावून उभी केली. तेव्हा समजलं की, तो साधा प्रवास करणारा ट्रक नव्हता. त्याच्या बोलण्यातून शंका आली. गेल्या काही दिवसापासून धमक्या येत आहेत. मला घातपाताची शक्यता वाटते. पोलीस, सरकार, गृहविभागाने तातडीने चौकशी करावी, याची अधिकची माहिती मी द्यायला तयार आहे, सरकारने तातडीने उपायोजना करणं आवश्यक आहे" असं आमदार राजेश राठोड म्हणाले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.