बेकायदा मद्य पिण्यास परवानगी देणाऱ्या १० हॉटेल, ढाब्यांवर कारवाई
४५ मद्यपींना न्यायालयाकडून दंड : ढाबा चालकांवरही गुन्हा; टेबल, खुर्च्या जप्त
सांगली : खरा पंचनामा
सांगली, मिरजेतील परमिट रूम, बिअर बारचा परवाना नसलेल्या तब्बल १० हॉटेल, ढाबे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये ४५ मद्यपींना न्यायालयाने दंड ठोठावला असून काही ढाबा चालकांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर एका ढाब्यावरील टेबल, खुर्च्या, दारूच्या बाटल्या असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्कच्या सांगलीतील भरारी पथकाने ही कारवाई केली आहे.
मिरज-पंढरपूर रस्त्यावरील हॉटेल टॉप ईन टाऊन, हॉटेल टोमॅटो, हॉटेल अषज्ञ, मिरजेतील कृष्णा घाट रस्त्यावरील हॉटेल मैत्री, सिद्धीविनायक हॅस्पिटलमागील हॉटेल कृष्णा, हरिपूर येथील हॉटेल कृष्णा, धामणी येथील हॉटेल सम्राट, हरिपूर येथील हॉटेल गरम मसाला, मिरज-कुपवाड रस्त्यावरील हॉटेल वैशाली या हॉटेल, ढाब्यांचा कारवाईमध्ये समावेश आहे. धामणी येथील हॉटेल सत्यमवर कारवाई करून तेथील टेबल, खुर्च्या तसेच दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी सत्यम हॉटेलचे मालक दामोदर खोत, शोभा खोत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान या सर्व हॉटेलमध्ये मिळून ३८ मद्यपींवर गुन्हा दाखल करून त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना शंभर रूपयांपासून एक हजार रूपयांपर्यंत दंड भरण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. दरम्यान यातील धामणी येथील सत्यम हॉटेलमध्ये मद्यपान करताना सापडलेल्या सातजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्यासह ढाबा चालकांविरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
राज्य उत्पादन शुल्कचे कोल्हापूरचे विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर, सांगलीचे अधीक्षक प्रदीप पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाचे निरीक्षक राजकुमार खंडागळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.