विट्यात दोन अट्टल चोरट्यांना अटक
साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त : विटा पोलिसांची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
खानापूर तालुक्यातील विटा येथील सुर्यनगर येथून शेळ्या चोरणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून छोटा लेलॅंड, १० शेळ्या, एक दुचाकी, रोकड असा साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्याशिवाय त्यांच्याकडून विटा आणि आटपाडी येथील पाच चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात यश आल्याची माहिती विट्याचे पोलिस निरीक्षक संतोष डोके यांनी दिली.
ओंकार हणमंत बोडरे (वय २०, रा. ताकारी, ता. वाळवा), विशाल ऊर्फ आकाश भिमाशंकर जाधव (वय २४, रा. सोन्याळ, ता. जत) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर आकाश दीपक घाडगे (रा. तुपारी) याचा पोलिस शोध घेत आहेत. विटा परिसरातील चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी निरीक्षक श्री. डोके यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला सूचना दिल्या होत्या.
पथक विटा परिसरात गस्त घालत असताना दोघेजण विटा-आळसंद रस्त्यावर विनाक्रमांकाची दुचाकी घेऊन फिरत असल्याची माहिती पथकाला मिळाली. पथकाने सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडील दुचाकीबाबत चौकशी केल्यानंतर त्यांनी ती आटपाडी येथून चोरल्याची कबुली दिली. त्याशिवाय विटा परिसरातही चार ठिकाणी चोऱ्या केल्याची कबुली दिली. त्यांना अटक करून त्यांच्याकडून एक छोटा लेलॅंड, एक दुचाकी, १० शेळ्या, रोकड, एक इलेक्ट्रिक मोटार असा साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिस निरीक्षक संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम माळी, अमोल कराळे, हेमंत तांबेवाघ, सुनील पाटील, प्रमोद साखरपे, महेश देशमुख, महेश संकपाळ, अक्षय पाटील आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.