तोतया एसीबीच्या टीमने निवृत्त अधिकाऱ्याच्या घरातून लाखो लुटले!
नवी मुंबई : खरा पंचनामा
ऐरोलीमध्ये एका सहाजणांच्या टोळीने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे म्हणजेच एसीबीचे अधिकारी असल्याचे भासवून लुट केल्याचे समोर आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागातील एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याच्या घराची झडती घेण्याच्या निमित्ताने त्याच्याच घरातील रोख रक्कम दागिने आणि अजूनही काही वस्तू लुटल्याचे समोर आले आहे. 34 लाख 85 हजार रुपये किमतीचा ऐवज लुटला असल्याचे उघडकीस आले आहे.
या घटनेबाबत रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सहा जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून रबाळे पोलीस अधिक तपास करत आहेत. नवी मुंबई शहरामध्ये राहणाऱ्या एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याच्या घरात सहाजणांनी तोतया लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी असल्याची बतावणी करुन दीड तासात 34 लाख 85 हजार रुपये लुटण्याची घटना घडली. ही घटना नवी मुंबईतील ऐरोली येथे घडली आहे. ही घटना 21 जुलैला घडली असली तरी सोमवारी याबाबतची तक्रार पिडीत सेवानिवृत्त अधिकाऱ्याने पोलिसांना दिली. याबाबत नवी मुंबईचे पोलीस तपास करत आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.