सांगलीतच निलंबन आणि सांगलीतच बडतर्फी!
एपीआय चंदनशिवेची सांगलीत वादग्रस्त कारकीर्द
सांगली : खरा पंचनामा
सांगलीतील तत्कालीन एपीआय सूरज चंदनशिवे याचा खून झाल्याची घटना गुरुवारी पहाटे उघडकीस आली. चंदनशिवे हा सांगलीत असतानाच खात्यातून निलंबित झाला होता. आणि सांगलीत असतानाच त्याला बडतर्फ (सक्तीने सेवानिवृत्त) करण्यात आले. एकंदरीत चंदनशिवेची सांगलीतील कारकीर्द वादग्रस्तच ठरली.
राज्य पोलिस दलाच्या 100 व्या बॅचमध्ये म्हणजे 2008-09 मध्ये चंदनशिवे उपनिरीक्षक म्हणून दाखल झाला. त्यानंतर त्याने अनेक ठिकाणी कर्तव्य बजावले. 2015 मध्ये चंदनशिवे सांगली पोलिस दलात रुजू झाला. त्याची थेट नियुक्ती एलसीबीमध्ये करण्यात आली. त्यावेळी त्याने वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक गुन्ह्यांचा चांगला तपास केला होता. मात्र वारणानगर येथील 9 कोटी रुपयांच्या चोरी प्रकरणात चंदनशिवे अडकला.
गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला निलंबित करण्यात आले. त्यानंतर त्याला त्या चोरी प्रकरणात कोल्हापूर सीआयडीने अटकही केली. या प्रकरणात असलेल्या अन्य संशयितांच्या आधी त्याचा जामीन मंजूर झाला. त्यानंतर चंदनशिवे काही दिवसांनी सांगलीत पुन्हा हजर झाला. हजर झाल्यानंतर त्याची नेमणूक मुख्यालयात करण्यात आली.
याच दरम्यान त्याने एका महिला पोलिस अंमलदाराशी दुसरे लग्न केले. ही बाब उघडकीस आल्यानंतर त्याला याच वर्षाच्या मे महिन्यात बडतर्फ (सक्तीने सेवानिवृत्त) करण्यात आले होते. एकंदरीत चंदनशिवे याचे चोरी प्रकरणात निलंबन आणि दुसरे लग्न केल्याने झालेली बडतर्फी सांगलीतच झाली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.