सांगलीत स्पा सेंटरमधील हाय प्रोफाइल वेश्या अड्डा उध्वस्त!
पोलिस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
सांगली शहरातील मध्यवर्ती बस स्थानकासमोर असणाऱ्या एका अपार्टमेंटमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असणारा वेश्या अड्डा छापा टाकून उध्वस्त करण्यात आला. सांगली शहरचे पोलिस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या पथकाने अचानक ही कारवाई केली. याबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
या छाप्यात पाच महिला आणि मुलींसह काही ग्राहकांना ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी स्पा सेंटर चालविणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडे कसून चौकशी सुरु आहे.
शहरातील झुलेलाल चौकात असणाऱ्या एका जुन्या अपार्टमेंट मध्ये अनेक नावांनी लॉज आहेत. या अपार्टमेंटच्या एका फ्लॅट मध्ये डीलक्स स्पा नावाने मसाज सेंटर चालविले जात होते. या मसाज सेंटरच्या नावाखाली एकाकडून वेश्या अड्डा सुरू होता. याची माहिती शहर विभागाचे उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांना मिळाली.
यानंतर जाधव यांनी कमालीची गोपनीयता बाळगत शुक्रवारी सायंकाळी बोगस ग्राहक पाठवून महिला पोलिसांसोबत याठिकाणी छापा टाकला.
यावेळी या फ्लॅट मध्ये ग्राहकांसाठी अनेक सोयी सुविधा असल्याचे निदर्शनास आले. स्वतंत्र खोली, ग्राहकांना बसण्यासाठी आसन, फ्लॅटच्या एंट्रीला रिसेप्शन असा आलिशान थाट होता. पोलिसांनी तेथे चौकशी केल्यानंतर पाच पीडित तरुणींकडून वेश्या व्यवसाय करून घेतला जात असल्याचे निष्पन्न झाले. संबंधित मुलींना पैशांचे आमिष दाखवून वेश्याव्यवसाय करण्यासाठी प्रवृत्त करून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेऊन त्यातून मिळालेल्या रकमेतून स्वतःची उपजीविका आरोपी चालवत असल्याचे समोर आले.
यानंतर पाच मुलींची सुटका करण्यात आली. मसाज सेंटर चालविणाऱ्या एका व्यक्तींसह एका ग्राहकाला ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.