त्यांच्या सुटकेचा आनंद पण...
सांगली : खरा पंचनामा
नवाब मलिक यांना जामीन मिळाला आहे, काल त्यांची सुटका झाली. त्यानंतर आता राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाकडून त्यांच्या तब्येतीची विचारपूस सुरू आहे. आज अजित पवार गटाच्या नेत्यांनी मलिक यांची भेट घेतली.
याचदरम्यान शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
नवाब मलिक यांना राजकारणात अडचणीत आणायचं नाही असं पाटील यांनी म्हटलं आहे.जयंत पाटील यांनी नेमकं काय म्हटलं? नवाब मालिक यांना राजकारणात अडचणीत आणायचं नाही. मलिक यांच्यावर झालेले आरोप अजून सिद्ध झालेले नाहीत.
त्यांना आता दोन महिन्यांचा जामीन मंजूर करण्यात आला आहे.
त्यांच्या सुटकेचा आम्हा सर्वांना आनंद आहे. पण त्यांना सध्या विश्रांतीची गरज आहे, त्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारची राजकीय तसदी देणार नसल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. ते मिरजमध्ये बोलत होते. अजित पवार गटाची भेट दरम्यान दुसरीकडे आज अजित पवार गटानं नवाब मलिक यांची भेट घेतली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.