चार महिन्यांत तीन अधिकाऱ्यांच्या तीनदा बदल्या : राज्य उत्पादन शुल्कचा नवा विक्रम
विट्यात असे दडलयं काय?
सांगली : खरा पंचनामा
राज्य उत्पादन शुल्क विभागाकडील (स्टेट एक्साईज) तीन दुय्यम निरीक्षकांच्या नुकत्याच जिल्हाअंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्य शासनाचा बदली अधिनियम धाब्यावर बसवून मेपासून आगस्टअखेरपर्यंत या तीन अधिकाऱ्यांच्या तीनदा बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे राज्यात पहिल्यांदाच चार महिन्यात तीन अधिकाऱ्यांच्या तीनदा बदल्या करण्याचा विक्रम राज्य उत्पादन शुल्क विभागाने नोंदवल्याची चचार् आहे. या बदल्यांमध्ये विटा केंद्रस्थानी असल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे विट्यात असे दडलयं काय? अशी चर्चा राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये रंगली आहे.
विटा येथील दुय्यम निरीक्षक सुरेश पाटील यांची इस्लामपूर येथे बदली करण्यात आली आहे. इस्लामपूर येथील सुनील पाटील यांची तासगाव येथे बदली करण्यात आली आहे. तर तासगाव येथील दुय्यम निरीक्षक श्रीमती माधवी गडदरे यांची विटा येथे बदली करण्यात आली आहे. या तीनही अधिकाऱ्यांच्या बदल्या कार्यकारी पदावर करण्यात आल्या आहे. मेअखेरीस राज्य उत्पादन शुल्क विभागाने दुय्यम निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश काढले होते. त्यावेळी माधवी गडदरे यांची इस्लामपूर येथे सुरेश पाटील यांची विटा येथे तर सुनील पाटील यांची तासगाव येथे बदली करण्यात आली होती.
त्यानंतर राज्य शासनाने सार्वत्रिक बदल्यांना ३० जूनपर्यंत मुदतवाढ दिली. या काळात सांगलीत कार्यरत असणारे सुरेश पाटील विटा येथे तर सुनील पाटील तासगाव येथे बदलीच्या ठिकाणी तात्काळ हजर झाले. मात्र श्रीमती गडदरे या इस्लामपूर येथे हजर झाल्या नाहीत. त्यानंतर जुलैमध्ये पुन्हा बदल्यांचे आदेश देण्यात आले. त्यानुसार सुनील पाटील यांची इस्लामपूर येथे तर श्रीमती गडदरे यांची तासगाव येथे बदली करण्यात आली. त्यानंतर आता काही दिवसांपूर्वीच पुन्हा बदल्यांचे आदेश काढण्यात आले. त्यानुसार विट्यातील सुरेश पाटील यांची इस्लामपूर येथे तर सुनील पाटील यांची तासगाव येथे तर गडदरे यांची विटा येथे बदली करण्यात आली आहे.
आयुक्तांवर दबाव कोणाचा?
तीनही बदल्या मुदतपूर्व विशेष विनंतीवरून करण्यात आल्या आहेत. याबाबतचे आदेश राज्य उत्पादन शुल्कचे आयुक्त डॉ. विजय सूयर्वंशी यांच्या सहीने शुक्रवारी काढण्यात आले आहेत. या बदल्यांच्या आदेशात बदल्या रद्द करण्यासाठी कोणताही प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे दबाव आणू नये असे म्हटले आहे. संबंधितांनी अशी कृती केल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याचे बदली आदेशात म्हटले आहे. दरम्यान विशेष विनंतीवरून या बदल्या केल्या असल्या तरी संबंधितांनी विशेष विनंतीचे अर्जच दिले नसल्याची चर्चा आहे. शिवाय चार महिन्यात तीनदा बदल्यांचे आदेश काढण्यासाठी आयुक्तांवर नेमका कोणाचा दबाव आहे अशीही चर्चा सुरू आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.