टँकरमधून डिझेल चोरी करणाऱ्या दोघांना अटक : 1 कोटींचा मुद्देमाल जप्त
चकलांबा पोलिसांची कारवाई
बीड : खरा पंचनामा
टँकरमधून डिझेल चोरी करणाऱ्या दोन परप्रांतीयांना रंगेहात पकडून अटक करण्यात आली. त्यांच्याकडून दोन टँकर, चोरलेले डिझेल असा 1 कोटी 4 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पाथर्डी ते कोळगाव राष्ट्रीय महामार्गावर चकलांबा पोलिसांनी ही कारवाई केली.
चंद्रभान राधेश्याम सरोज (वय 24, रा. सगरा सुंदरपूर, जि. प्रतापगड, उत्तर प्रदेश), मुबारक सलीम मुल्ला अली (वय 40, रा. बंगरा, जि. सिद्धार्थनगर, उत्तर प्रदेश) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. सहायक निरीक्षक नारायण एकशिंगे यांना गोपनीय बातमीदारांकडून माहिती मिळाली होती की, पाथर्डी ते कोळगाव जाणारे राष्ट्रीय महामार्गवरील हॉटेल रणवीर येथे दोन रिलायन्स कंपनीचे डिझेलचे भरलेले टँकर उभे आहेत. त्यामधून एकजण डिझेलचे टँकर मधे पाईप टाकून डिझेल काढत आहे. श्री. एकशिंगे यांनी तातडीने पाठवून पाठवून छापा टाकला.
त्यावेळी एकजण टँकरवर (क्र. एमएच 46 बीएम 8494) एक हिरव्या रंगाचा पाईप टँकर वरील झाकण खोलून त्यात पाईप टाकून टँकरचे डिझेल टाकीत सोडत असताना सापडला. त्यावेळी तेथे एक 20 लिटरचे डिझेलने भरलेले कॅन सापडले. तर शेजारी टँकर (क्र. एमएच 04 केयु 2834) हा लोकांना डिझेल चोरी करताना दिसू नये अशा पद्धतीने उभा करून त्या टँकरवर एक जण डिझेल चोरी करण्याच्या तयारीत बसलेला सापडला.
त्यांच्याकडे सखोल चौकशी केल्यावर असता चंद्रभान सरोज हा टँकर (क्र. एमएच 46 बीएम 8494) चा चालक असल्याचे सांगितले तसेच मुबारक मुल्ला अली हा टँकर (क्र. एमएच 04 केयु 2834) चा चालक असल्याचे सांगितले. त्यांना टँकर मधून काढलेले डिझेल बाबत विचारपूस केली असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली.
त्यांच्याकडून दोन्ही टँकर तसेच डिझेलचे भरलेले कॅन असा 1 कोटी 4 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोघांनाही अटक करून त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणात मोठे रॅकेट असण्याची शक्यता असल्याची पोलिसांना शंका आहे.
चकलांबा पोलिस ठाण्याचे प्रभारी सहायक निरीक्षक नारायण एकशिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अनंता तांगडे, परमेश्वर इंगळे, राम बारगजे, किरण मिसाळ, श्री. घोंगडे, श्री. गायकवाड यांनी ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.