रोहित पवारांना रात्री 2 वाजता नोटीस, बारामती अॅग्रो 72 तासात बंद करण्याची सूचना
मुंबई : खरा पंचनामा
बारामतीमधील बारामती ॲग्रो या प्लॅन्टवर रात्री दोन वाजता महाराष्ट्र प्रदूषण विभागाने कारवाई केली आहे. रोहित पवार यांना रात्री 2 वाजता नोटीस दिली असून 72 तासांत प्लांट बंद करण्याची सूचना नोटीसीच्या माध्यमातून दिली आहे. रोहित पवार यांनी स्वतः वीट करत यासंदर्भात माहिती दिली आहे.
राष्ट्रवादी (शरद पवार गटाचे आमदार) रोहित पवार यांनी वीट केलं आहे की, "दोन मोठ्या नेत्यांच्या सांगण्यावरून कुठला तरी द्वेष मनात ठेवून आज पहाटे दोन वाजता एका शासकीय विभागाच्या माध्यमातून माझ्या कंपनीच्या एका विभागावर कारवाई करण्यात आली."
"युवा मित्रांना एकच सांगू इच्छितो की, संघर्ष करतांना भूमिका घेताना अनेक अडचणींचा सामना करावाच लागतो. मी बोलतो, ठोस भूमिका घेतो म्हणून मला अडचणीत आणण्यासाठी आता प्रयत्न सुरू झाले आहेत, परंतु अडचणी आल्या म्हणून संघर्ष थांबवायचा नसतो. भूमिका आणि निष्ठा बदलायची नसते ही मराठी माणसाची खासियत आहे.", असं रोहित पवार म्हणाले आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.