इंडियन स्वच्छता लीग 2.0 अंतर्गत महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी
सांगली : खरा पंचनामा
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वतीने इंडियन स्वच्छता लीग 2.0 अंतर्गत महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. जामवाडी आरोग्य केंद्रामध्ये स्वच्छता आणि सफाई मित्रांची आरोग्य तपासणी घेण्यात आली यामध्ये 100 हुन अधिक स्वच्छता मित्रांनी सहभाग घेतला.
महापालिका आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपायुक्त राहुल रोकडे आणि उपायुक्त स्मृती पाटील, उपायुक्त वैभव साबळे यांच्या सूचनेनुसार ही आरोग्य तपासणी झाली. यामध्ये महापालिकेच्या सफाई मित्रांची शुगर, बीपी तसेच किरकोळ आजाराबाबत तपासणी करण्यात आली.
वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वर्षा पाटील आणि डॉक्टर प्रथमेश पाटील यांच्या टीमने सर्व कर्मचाऱ्यांची तपासणी केली इंडियन स्वच्छता 2.0 अंतर्गत ही आरोग्य तपासणी मोहीम पार पडली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.