Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कोल्हापुरात हसन मुश्रीफांनी खासदार संजय मंडलिकांचे काम अडवले!

कोल्हापुरात हसन मुश्रीफांनी खासदार संजय मंडलिकांचे काम अडवले!



कोल्हापूर : खरा पंचनामा

अजित पवार भाजपला मांडीला मांडी लावून बसल्यानंतर शिंदे गटाची अवस्था सासूसाठी वाटणी केली आणि सासूच वाटणीला आली अशी झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून याची चर्चा ठळकपणे रंगली असतानाच त्याचे थेट पडसाद आज कोल्हापुरात उमटले.

कोल्हापुरात अजित पवार गटाचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी खासदार संजय मंडलिक यांचे काम अडवल्याचा आरोप शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष राजेखान जमादार यांनी केला. त्यामुळे कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयमध्ये चांगलेच घमासान झाले. बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात शाब्दिक चकमक झाली. अजित पवार गटाला सोबत घेऊन अडचण झाल्याचा आरोपही राजेखान जमादार यांनी केला. यावेळी पीडब्ल्यूडी विभागातील अधिकाऱ्यांना प्रश्नांचा भडीमार करत जाब विचारण्यात आला.

जिल्हाध्यक्ष राजेखान जमादार यांनी संबंधित अधिकाऱ्याला कॅमेऱ्यासमोर आणत काम कोणी थांबवलं आहे हे जाहीरपणे सांगावे अशी मागणी केली. ते म्हणाले की, अडवून ठेवण्यात आलेल्या कामाची प्रक्रिया पूर्ण झाली असून जून महिन्यात टेंडर निघाले आहे, पण ठेकेदाराच्या मर्जीसाठी वर्क ऑर्डर देत नाहीत, असं काम चालणार नाही. अजित पवार गट सत्तेत सहभागी करून घेतल्याने अडचण होत असल्याचा आरोपही राजेखान जमादार यांनी केला. फक्त इथंच नाही, तर कागलमध्ये अडचण होत आहे. सरळ त्यांचे नाव सांगतात. टेंडर रद्द करण्यास सांगण्यात आले, पण केलेलं नाही असेही अधिकाऱ्यांनी सांगितल्याचे जमादार म्हणाले. विकासकामासाठी निधी आणला म्हणून जाहिरात करणाऱ्यांनी टेंडर रद्द करण्यासाठी कसं सांगतात? असा सवाल त्यांनी केला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.