उटगीत तीन पानी जुगार खेळणाऱ्या ५ जणांना अटक
सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त : उमदी पोलिसांची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
जत तालुक्यातील उटगी येथे शेतात सुरु असलेल्या तीन पानी जुगाराच्या अड्ड्यावर छापा टाकून पाचजणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून रोकड, दुचाकी, मोबाईल जप्त करण्यात आला आहे. उमदी पोलिसांनी शुक्रवारी रात्री ही कारवाई केली.
रायगोंड तायाप्पा मांग (वय ४०, रा. सोन्याळ), विकास दगडू जाधव (वय ४५, रा. सोन्याळ), सदेव चंद्रकांत भंडारे (वय २४, रा. हुन्नूर, मंगळवेढा), सागर महादेव बजंत्री (वय २३, रा. सोन्याळ फाटा), विशाल भिमाशंकर जाधव (वय २४, रा. सोन्याळ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
उटगी येथील जाडर बोबलाद रस्त्यावर रायगोंड मांग यांची शेती आहे. या शेतात सर्व संशयित तीन पानी जुगार खेळत असल्याची माहिती उमदीचे सहायक पोलिस निरीक्षक संदीप शिंदे यांना खबऱ्याद्वारे मिळाली. त्यांनी तातडीने पथकासह मांग याच्या शेतात छापा टाकला. त्यावेळी जुगार खेळताना पाचहीजणांना रंगेहात पकडण्यात आले. त्यांच्याविरोधात उमदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उमदीचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक लक्ष्मण खरात, प्रशांत कोळी, कपील काळेल, अमित चौगुले, सोमनाथ पोटभरे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.