अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर मिरजेसह जिल्ह्यात तगड़ा पोलिस बंदोबस्त
सांगली : खरा पंचनामा
अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात तीन हजारपेक्षा अधिक पोलिस अधिकारी आणि कर्मचारी गुरुवारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत. प्रामुख्याने विसर्जनाच्या ठिकाणांसह संवेदनशील गावात देखील पुरेसे पोलीस तैनात करण्यात आले आहे. एकंदरित गुरुवारी जिल्ह्यात तगडा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
विसर्जन मिरवणूकीत ध्वनी मर्यादेचा भंग करणाऱ्या मंडळाविरोधात कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. आतापर्यत जिल्ह्यातील ७५ मंडळांवर ध्वनीप्रदुषण नियंत्रण अधिनियम आणि पर्यावरण संरक्षण अन्वये कारवाई करण्याची प्रक्रिया सध्या सुरु आहे. गुरुवार दि. २८ रोजी अनंत चतुर्दशी असल्यामुळे जिल्ह्यातील मोठ्या गणेश मंडळाच्या मिरवणूका निघणार आहेत. या कालावधीत कायदा सुव्यवस्थेस कोणतीही बाधा येवू नये याकरिता पोलिसांनी मिरवणूकीच्या मार्गासह अन्य प्रमुख ठिकाणी बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
पोलीस अधिक्षक डॉ. बसवराज तेली यांच्या नेतृत्वाखाली ७ पोलीस उपअधिक्षक, २२ पोलीस निरिक्षक,१३१ सहाय्यक पोलीस निरिक्षक, १६०७ पोलीस अंमलदार, ९५० होमगार्ड, एसआरपीएफच्या २ प्लाटून आणि १४ स्ट्रायकिंगची पथके मिरवणूकीवर लक्ष ठेवणार आहेत. मिरजेत विसर्जन मिरवणूक मोठी असल्याने तेथे ४ पोलीस उपअधिक्षक, १२ पोलीस निरिक्षक, ६१ सहाय्यक पोलीस निरिक्षक, ५६८ पोलीस अंमलदार, ७५ वाहतूक अंमलदार, २११ होमगार्ड, एसआरपीएफची १ प्लाटून आणि ४ स्ट्रायकिंगचे पथकाचा समावेश बंदोबस्तात करण्यात आला आहे.
गणेशोत्सव कालावधीत ध्वनी प्रदुषण नियंत्रण अधिनियमाची अंमलबजावणी काटेकोर करण्यात येत आहे. प्रत्येक पोलीस ठाण्यात ध्वनी मापक यंत्रे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. तसेच त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस ठाणे निहाय एक पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार अशा पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. आतापर्यत जिल्ह्यातील १२५ गणेश मंडळ मिरवणूकीत ध्वनी तीव्रता तपासण्यात आली आहे. त्यापैकी ६५ डेसिबल तीव्रतेपेक्षा कमी ध्वनी मर्यादा ठेवणाऱ्या मंडळाची संख्या ४९ आहे. तर ७६ मंडळांनी ध्वनी मर्यादेचे उल्लंघन केल्याचे समोर आहे. अनंत चतुर्दशी दिवशी देखील पोलिसांची ध्वनी तीव्रतेवर नजर असणार आहे. सोशल मीडियावर कोणीह आक्षेपार्ह मजकूर शेअर न करण्याचे आवाहन करण्यात आले असून सायबरची त्यावर नजर राहणार आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.