सेवानिवृत्त अति वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची दीड कोटींची फसवणूक!
पुणे : खरा पंचनामा
फुटवेअर कंपनीत गुंतवणुक करण्यास सांगून कोणताही परतावा न देता कराराचा भंग करुन अति सेवानिवृत्त वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची १ कोटी ५५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी पुण्यातील मॉडेल कॉलनीमध्ये राहणाऱ्या 75 वर्षीय सेवानिवृत्त अति वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राजेश वसंतराव कारंडे (वय ५७), निलेश वसंतराव कारंडे यांच्यासह 3 महिलांवर (सर्व रा. मॉडेल कॉलनी) गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २०१७ पासून आतापर्यंत घडला आहे.
फिर्यादी यांना आरोपींनी त्यांच्या कास फुटवेअर प्रा. लि. कंपनीत गुंतवणुक करण्यास सांगितले. फिर्यादी यांच्या मुलाबरोबर त्यांनी पार्टनरशिप करुन कंपनीत १ कोटी ५५ लाख रुपये गुंतवणूक केली. या गुंतवणुकीपोटी पॉवर ऑफ अॅटर्नी करण्यात आली. त्यांना शेअर्स सर्टिफिकेटही देण्यात येऊन करारनामा करण्यात आला होता, असे असताना राजेश कारंडे व इतरांनी फिर्यादी यांचे शेअर्स परस्पर ट्रान्सफर केले. त्यांना परतावा म्हणून दिलेले धनादेश परत आले. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर फिर्यादीने पोलिसांकडे तक्रार अर्ज केला होता. त्यानंतर पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांच्या आदेशानुसार गुन्हा दाखल केला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.