राजापुरात उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांवर गोळीबार!
संशयित तिघांना आंबोलीत पकडले
आंबोली : खरा पंचनामा
दारू वाहतूकीचा पाठलाग करणाऱ्या राजापुर येथील उत्पादन शुल्कच्या पोलिस अधिकाऱ्यांच्या गाडीवर गोळीबार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना आंबोली येथे ताब्यात घेण्यात आले आहे.
यातील दोघे सोलापूर जिल्ह्यातील तर एकजण राजस्थान येथील आहे. हा प्रकार काल, मंगळवारी रात्रीच्या सुमारास राजापुर येथे घडला. संशयित तिघांना आज, बुधवारी पहाटे शिताफीने कोल्हापुरच्या दिशेने पलायन करताना आंबोली येथे पकडण्यात आले.
प्रविण परमेश्वर पवार (२५, रा. तांबाळे, ता. मोहोळ), शेखर नेताजी भोसले (२५, रा. खवणे, ता. मोहोळ), प्रेमकुमार जेटाराम चौधरी (२३, रा. गुडामलानी- बाडनेर राजस्थान) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
राजापूर येथून दारू वाहतूक होणार असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्यासाठी उत्पादन शुल्क विभागाने सापळा रचला होता. यावेळी हे तीन युवक दारु वाहतूक करीत होते. यावेळी राज्य उत्पादन शुल्काच्या अधिकारी पाठलाग करत असल्याचे संशयित आरोपीच्या लक्षात येताच त्यांनी पोलिसांवर फायरिंग केले. अन् सिंधुदुर्गच्या दिशेने पळ काढला.
संशयितांना पकडण्यासाठी सावंतवाडी पोलिसांनी आंबोली येथे सापळा रचला. यामध्ये पहाटेच्या सुमारास या तिघांना पकडण्यास यश आले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.