इंडिया लिहिलेल्या नोटांचे आता काय होणार?
नवी दिल्ली : खरा पंचनामा
G-20 कार्यक्रमासाठी पाहुण्यांना पाठविलेल्या निमंत्रण पत्रिकेने देशात नवीन महाभारताला फोडणी दिली. इंडिया या शब्दाऐवजी राष्ट्रपती द्रौपदी मूर्म यांनी भारत हा शब्द वापरला.
विरोधी पक्षाच्या आघाडीला सध्या INDIA असे नाव देण्यात आले आहे. त्यामुळे विरोधकांनी केंद्र सरकारवर तोफ डागली आहे.
आघाडीला घाबरुनच केंद्र सरकारने ही चाल खेळल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यात संसदेच्या नवीन इमारतीत विशेष सत्र होण्याची शक्यता आहे. विशेष सत्रात देशाचे अधिकृत नाव भारत करण्याचा प्रस्ताव मांडल्या जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. इंडिया गुलामीचे प्रतिक असल्याने ते बदलण्याचा विचार बोलून दाखविण्यात येत आहे. पण यामध्ये आणखी एक चिंता समोर येत आहे.
यापूर्वी 8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदी केली होती. त्यानंतर या 23 मे 2023 रोजीपासून दोन हजारांची नोट माघारी घेण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यामुळे नावात बदल झाला तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ऐवजी रिझर्व्ह बँक ऑफ भारत अशा नोटा बाजारात आणव्या लागतील काय, अशी शंका विचारण्यात येत आहे.
काही तज्ज्ञांच्या मते, इंडिया ऐवजी भारत हा शब्द अधिकृत केला तरी, केंद्र सरकार नोटबंदी करण्याची घाई करणार नाही. असा धोका पत्करणे सध्याच्या सत्ताधाऱ्यांना योग्य नसेल. त्यामुळे नोटबंदीचा धोका हे सरकार उचलणार नाही. गेल्यावेळी झालेल्या नोटबंदीचा परिणाम देशावर अनेक दिवस दिसून आला. त्याऐवजी मध्यम मार्ग काढण्यावर भर देण्यात येऊ शकतो.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.