Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

गुजरातमध्ये समुद्र किनाऱ्यावर सापडलं ८०० कोटींचं कोकेन!

गुजरातमध्ये समुद्र किनाऱ्यावर सापडलं ८०० कोटींचं कोकेन!



अहमदाबाद : खरा पंचनामा

गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील गांधीधाम शहरतील खाडीच्या किनारी बुधवारी ८० किलोग्रॅम कोकेन सापडल्याने खळबळ उडाली आहे. या कोकेनची किंमत तब्बल ८०० कोटी रुपये इतकी आहे. एका पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, कोकेनचे एक-एक किलोग्रॅमचे ८० पाकिटे सापडले आहेत.

कच्छच्या पूर्व विभागाचे पोलीस अधीक्षक (एसपी) सागर बागमार यांनी पकडले जाण्याचा भीतीने तस्करांनी कोकेनची पाकिटे फेखून दिले, कारण पोलिस या भागात सक्रिय आहेत अशी माहिती दिली. बागमार यांनी सांगितले की आमली पदार्थ गांधीधाम शहराजवळ मिथी रोहर गावाजवळील अरुद खाडीच्या किनाऱ्यावर फेकण्यात आले होते.

एसपींनी सांगितले की, अमलीपदार्थांची खेप पोहचवली जात असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिस त्या भागात आधीच सक्रिय झाले होते. आमच्या सर्च ऑपरेशन दरम्यान एका अरूद खाडीच्या किनाऱ्यावर एक-एक किलो वजनाचे कोकेनची ८० पाकिटे मिळाली आहेत ज्यांची किंमत ८०० कोटी रुपये आहे.

सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) आणि इतर तपास यंत्रणांना देखील मागील दोन वर्षांपासून जखाऊ जवळ सतत होरॉइन आणि कोकेनची पाकिटे आढळत आहेत. जखाऊ पाकिस्तानपासून खूप जवळ आहे. तसेच यापूर्वी देखील तपासात पकडले जाऊ नये म्हणून तस्करांनी अशी पाकिटे समुद्रात फेकून दिली होती, जी नंतर वाहून किनाऱ्यावर आल्याचे समोर आले होते.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.