Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

जालन्यातील हिंसाचार प्रकरणात ३०० हून जणांवर गुन्हे; पोलिसांना जीवे मारण्याचा कट रचल्याचा आरोप

जालन्यातील हिंसाचार प्रकरणात ३०० हून जणांवर गुन्हे; पोलिसांना जीवे मारण्याचा कट रचल्याचा आरोप 



जालना : खरा पंचनामा 

जालन्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी शुक्रवारी तुफान लाठीमार केला. या लाठीमारात अनेक आंदोलक जखमी झाले. त्यानंतर या घटनेचे पडसाद राज्यभरात उमटले. 

राज्यात ठिकठिकाणी आंदोलकांनी रस्त्यावर उतरून वाहनांची तोडफोड केली. तसेच काही ठिकाणी बसेसही जाळण्यात आल्या. आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीत एका पोलीस अधिकाऱ्यासह काही पोलीस कर्मचाऱ्यांना देखील गंभीर दुखापती झाल्या आहेत. अशातच एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. जालन्यात जाळपोळ आणि दगडफेक प्रकरणी पोलिसांनी गुन्हे दाखल करण्यास सुरूवात केली आहे. 

पोलिसांनी आतापर्यंत एकूण ३०० ते ३५० अज्ञात लोकांवरतीही गुन्हे दाखल केले आहे. तर काही ठिकाणी आंदोलकांना ताब्यात देखील घेतलं आहे. जालन्यातील गोंदी पोलीस स्थानकात कलम ३०७ आणि ३३३ अंतर्गत या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. सार्वजनिक मालमत्तेलचे नुकसान करणे, जाळपोळ तसेच दगडफेक करणे, अशा गुन्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. दरम्यान, हे गुन्हे दाखल केलेल्या अज्ञात व्यक्तींची संख्या आणखीच वाढू शकते, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.