Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

देश अमृतकाळ साजरा करतोय आणि शेतकरी आत्महत्या करतोय!

देश अमृतकाळ साजरा करतोय आणि शेतकरी आत्महत्या करतोय!



मुंबई : खरा पंचनामा

महाराष्ट्रात दुष्काळाच्या झळा तीव्र होत चालल्या आहेत. राज्यात 1 जानेवारी ते 31 जुलै यादरम्यान तब्बल 1 हजार 555 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. याबाबत चिंता व्यक्त करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी, देश अमृतकाळ साजरा करत आहे आणि शेतकरी आत्महत्या करत आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.

शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या अधिकच वाढत चालल्या आहेत. यवतमाळ जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत सहा शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे. या सरकारच्या काळात हतबल झालेल्या शेतकऱ्यांना आपले जीवन संपवणे सोपे वाटले, हेच सरकारचे अपयश असल्याची टीका जयंत पाटील यांनी केली आहे.

गेल्या नऊ महिन्यांमध्ये विदर्भात 1 हजार 584 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या असल्याची बाब समोर आली आहे. गेल्या 25 वर्षांतील ही सर्वाधिक संख्या आहे. यवतमाळ जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत सहा शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे. कर्ज काढून पिक लावणी केली. मात्र अतिवृष्टीमुळे जमीन खरडून गेली. हातातोंडाशी आलेले पीक जमीनदोस्त झाले. देश अमृतकाळ साजरा करत असताना भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असलेला शेतकरी मात्र विष पिऊन आत्महत्या करत आहे. ही धोक्याची घंटा सरकारने ओळखावी आणि शेतकऱ्यांना सढळ हाताने मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.